मुख्यपृष्ठ › शेती व पर्यावरण
दरवर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात जलसंधारण, मृदा व कचरा व्यवस्थापन आणि वृक्षारोपणाबाबत १० गावांत प्रशिक्षण दिले. ७५० शेतकरी व महिला पर्यावरण रक्षणात सक्रिय झाल्या.

नवरात्र व कोजागिरी पौर्णिमा यात्रेत तुळजापूर येथे हजारो भाविकांपर्यंत पर्यावरणाचा संदेश पोहोचवला.

हंगरगा, बोरगाव, सिंदगाव व सालगरा या गावांत शेतकरी बैठका, पोस्टर प्रदर्शन, प्रशिक्षण व चित्रपट प्रदर्शनातून शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्यावर भर दिला. AFARM पुणे यांच्या सहकार्याने कापूस लागवडीसाठी गादीवाफे तयार झाले व जमिनीची सुपीकता वाढली.

पाणीटंचाईमुळे कोरडवाहू शेतीकडे वळलेल्या येडोळा, वागदरी, गुजनूर व शहापूर येथील शेतकऱ्यांना स्थानिक हवामानास योग्य आधुनिक शेती ज्ञानाचे प्रशिक्षण दिले.

पौष्टिक तृणधान्यांचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांची उपजीविका बळकट करण्यासाठी AFARM च्या सहकार्याने हे अभियान सुरू आहे.

देणगी द्या, स्वयंसेवक व्हा किंवा आमच्यासोबत भागीदारी करा.
मदत करासंपर्क साधा