मुख्यपृष्ठ › जलसंधारण व स्वच्छता
जिल्हा परिषद व उस्मानाबाद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या भागीदारीतून तुळजापूर तालुक्यातील ६ गावांत महिला बचत गटांना पाणी व्यवस्थापन आणि स्वच्छतेचे प्रशिक्षण दिले.

यशदा, पुणे यांच्या सहकार्याने परंडा, कळंब व तुळजापूर तालुक्यांतील १७ गावांत शेतकरी, महिला व मजुरांना जलव्यवस्थापन व स्वच्छतेचे प्रशिक्षण दिले. सुमारे १५,००० शेतकऱ्यांपर्यंत पोहोच.

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत १५ गावांत मनरेगाबाबत जागृती केली. कामगारांना जॉब कार्ड मिळवून दिले, कामांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले, जनावरांसाठी चारा-पाण्याची सोय केली आणि १५ विधवा शेतकरी महिलांना पीक विमा मिळवून दिला. दिलासा संस्था, यवतमाळ यांचे सहकार्य.

देणगी द्या, स्वयंसेवक व्हा किंवा आमच्यासोबत भागीदारी करा.
मदत करासंपर्क साधा