परिवर्तन सामाजिक संस्था, नळदुर्ग

संस्थेचा परिचय

मुख्यपृष्ठ › संस्थेचा परिचय

आमची कहाणी

परिवर्तन सामाजिक संस्था ही उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील ग्रामीण, वंचित समुदायांसाठी कार्य करणारी संस्था आहे. पोतराज समाजातील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा दूर करण्याच्या ध्येयातून १९९६ मध्ये आमचा प्रवास सुरू झाला.

पुढे महिला सक्षमीकरण, शिक्षण, आर्थिक संधी, जलसाक्षरता, पर्यावरण व शाश्वत शेती यांवर काम विस्तारले. समता, सामाजिक न्याय, पर्यावरणीय जबाबदारी व लोकसहभाग ही आमची मूल्ये आहेत.

आमची कहाणी

आमचा प्रवास

१९९६

४ ऑगस्ट रोजी तुळजापूर येथे संस्थेची स्थापना; पोतराज समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनाने सुरुवात.

२००३–०६

महिला बचत गट, रमाई कार्यक्रम व पंचायत राज प्रशिक्षण.

२००४–०५

जलस्वराज्य प्रकल्प – ६ गावांत पाणी व स्वच्छता.

२००८

तुळजापूर यात्रांमध्ये पर्यावरण जनजागृती अभियान.

२०११–१४

एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन – १७ गावे.

२०१५–१६

मनरेगा जनजागृती कार्यक्रम.

२०२३–२४

तृणधान्य प्रचार अभियान.

कार्यक्षेत्र व मान्यता

आमचे कार्य तुळजापूर, लोहारा, कळंब व परंडा तालुक्यांत (जि. धाराशिव) चालते.

  • नोंदणी: Society Registration Act 1860 – MAH/371/96
  • BPT Act 1950 – F-0003237
  • 80G – AAATP8290MF20212
  • 12A – AAATP8290ME2002501
  • NITI Aayog Unique ID – MH/2017/0120129
  • नेहरू युवा केंद्र, उस्मानाबाद – उत्कृष्ट संस्था पुरस्कार
कार्यक्षेत्र व मान्यता

तुमचे योगदान एखाद्याचे आयुष्य बदलू शकते

देणगी द्या, स्वयंसेवक व्हा किंवा आमच्यासोबत भागीदारी करा.

मदत करासंपर्क साधा